पिंपरी : अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सफाई कामगार, ड्रेनेजची सफाई करणारे कामगार, पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह लोकपयोगी कामात सहभाग नोंदविणाऱ्या सफाई कामगारांना मिठाईचे वाटप करून परिसरातील २२ ठिकाणी कामगारांच्या हस्ते केक कापण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास माजी नगरसेवक रोहित आप्पा काटे, माजी नगरसेविका माई काटे, माजी नगरसेवक सन्नी ओव्हाळ, मंगेश नवघणे, चिंतामण काटे, माजी नगरसेविका संध्याताई गायकवाड, सुनिताताई अडसुळे, सुप्रियाताई काटे, अस्मिताताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रमाताई सन्नी ओव्हाळ यांनी केले होते.




