मोशी ; राष्ट्रवादी शिक्षक सेल वतीने वाघेश्वर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेलचे निर्मिती करण्यात आली असून सेलचे उद्घाटन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवकर घनश्याम खेडकर, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप यांच्यासह पंडीत तापकीर, किसन गाडेकर, ज्योती तापकीर, विपुल तापकीर, पूनम वाघ, अनिल तापकीर, गणेश ताजने, गुलाब ताजने, विजया कांबळे, दत्ता बुरडे, सुनील पठारे, तानाजी तापकीर, ॲड. संतोष तापकीर, रामभाऊ सासवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. डॉ. संदीप तापकीर यांचा संकल्पनेतून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी अंकिता काळजे हिचा ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अजित गव्हाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य शशीकांत पेठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हिरामण सस्ते, शारदा सस्ते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर सारीका तापकीर यांनी सूत्रसंचालन केले शेवटी मोहन कांबळे यांनी आभार मानले. मुख्य कार्यक्रमानंतर वाघेश्वर विद्यालयाच्या वतीने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. यानंतर शाळेमध्ये वृक्षारोपन करून कार्यक्रमाची सांगता झाली.




