देहुगाव ( वार्ताहर ) जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 337 वा पालखी सोहळ्याचे सुमारे 35 दिवसांच्या प्रवासानंतर तीर्थक्षेत्र देहूत आज (दि.२४ ) एकादशी दिनी पुर्नरागमन होणारा असून सोहळ्याची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी ३३७ वा पालखी सोहळ्याने तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील नगर प्रदक्षिणा करून बुधवारी ( दि.१३ जुलै ) सोहळा दुपारी एकच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूकडे परतीच्या प्रवासाला प्रस्थान ठेवले होते. सुमारे ३५ दिवसांच्या प्रवासातील पिंपरी गाव येथील भैरवनाथ मंदिरातील शनिवारी रात्रीचा मुक्कामानंतर तीर्थक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होत आहे. मुंबई पुणे महामार्गाने चिंचोली येथील विसावा घेत पालखी सोहळ्याचे आज रविवारी ( दि.२४ ) तीर्थक्षेत्र देहूत पुर्नरागमन होणार आहे. मुख्य मंदिरामध्ये पालखी सोहळयाची दुपारी सांगता होईल.
श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने चिंचोली शनी मंदिरा जवळील पालखी सोहळ्याच्या विसावा स्थळी भाविकांना व वारकऱ्यांना एकादशी निमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.




