पिंपरी – उद्योजक, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि जिजामाता पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर बाबर (वय-७२) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी त्याचे मोठे बंधू शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांचे निधन झाले होते. माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांचे ते लहान भाऊ आहेत. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश बाबर हे त्यांचे चिरंजीव आहेत.
https://maharashtramaza.online/?p=157197
सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना निरामय रुग्णालयात दाखल केले पण तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज रविवार दिनांक २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता निगडी येथील स्मशानात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काळभोरनगर येथील राष्ट्रतेज सार्वजनिक गणेश मंडळ, जिजामाता पतसंस्था आणि गजानन लोकसेवा सहकारी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शहरातील सर्व प्लॅस्टिक उद्योगजकांचे संघटन करुन समस्या मांडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी काळभोरनगर मोहननगर विभागातून पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक म्हणून हे काम पाहिले आहे.




