पिंपरी : रहाटणी -पिंपळे सौदागर प्रभागातील कु. विधी चौहाण हिने इयत्ता १० वी मध्ये ९९.६० % टक्के मिळवत आयसीएससी बोर्ड मधुन ५०० पैकी ४९८ गुण संपादित करून भारतात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचा मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
ICSE चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. तुम्ही येथून निकाल तपासू शकता: https://cisceresults.trafficmanager.net/. यात चार विद्यार्थ्यांनी 99.8% गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर 34 विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळविला.
यात पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या दोन्ही गुणांना अंतिम गुणांमध्ये समान महत्त्व दिले जाईल. जे उमेदवार सेमिस्टर 1 किंवा सेमिस्टर 2 च्या परीक्षेला बसले नाहीत त्यांना गैरहजर म्हणून चिन्हांकित केले जाईल आणि त्यांचे निकाल जाहीर केले जाणार नाहीत.
बोर्डाच्या इतिहासात प्रथमच CISCE ने एकाच वर्षात दोन परीक्षा घेतल्या. सेमिस्टर एक परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर, 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती, तर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा एप्रिल-मे, 2022 मध्ये इयत्ता 10 आणि 12वी या दोन्हींसाठी घेण्यात आल्या होत्या.




