वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विकास कामांसाठी मागील अडीच वर्षात जेवढा निधी उपलब्ध करून दिला आहे तेव्हढाच निधी पुढील काळात देखील उपलब्ध करून देऊ, सत्ता असो किंवा नसो पण जनतेची विकास कामे थांबता कामा नये. सत्तेत नसलो तरी तालुक्यातील विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही. सरकार कुठलंही असलं तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करणे ही माझी जबाबदारी आहे. यापूर्वी तुम्ही सत्तेतील सुनिल शेळके कसं काम करतो ते पहिलंत आता पुढील काळात सत्तेत नसताना सुनिल शेळके कसं काम करतो ते देखील पहा असे वक्तव्य आमदार सुनिल शेळके यांनी केले. ते वडगाव येथे “अजित स्वाभिमान” सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, संचालक सुभाष जाधव, मंगेश ढोरे, चंद्रकांत ढोरे, गंगाराम ढोरे, तुकाराम ढोरे, माजी नगरसेवक सुनिल ढोरे, प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, क्रीडा सेल अध्यक्षा हर्षदाताई दुबे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, माजी महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, मंगल मुऱ्हे, वडगाव शहराध्यक्षा पद्मावती ढोरे, वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, राजेश बाफना, ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, डॉ.दिनेश दाते, भाऊ ढोरे, विशाल वहिले, सिद्धेश ढोरे, आफताब सय्यद, भूषण ढोरे, मयूर गुरव आदि. मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अजित स्वाभिमान सप्ताह’ अंतर्गत वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गरजू रुग्णांसाठी आवश्यक वस्तु वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे झाला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा गरजू रुग्णांना नक्कीच फायदा मिळेल. तसेच यावेळी मावळची सुवर्णकन्या हर्षदा गरुड हिने ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. तिने आणखी चमकदार कामगिरी करत मावळ तालुक्याचे नाव जगभर पोहोचवावे.यासाठी तिच्या मेहनतीला आर्थिक बळाचे पंख मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आर्थिक मदत देखील करण्यात आली.




