पिंपरी : नवी सांगवीतील एचडीएफसी बँक चौकात महावितरणचे रोहित्र (ट्रान्सफार्मर ) आहे. त्याला केवळ दोन फुटाच्या अंतराने स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकार्यांनी खुली व्यायाय यंत्र ( ओपन जीम ) बसविले आहे. त्यावर लहान मुलांपासून जेष्ठ नागरिक व्यायामाचा लाभ घेत असतात. याठिकाणी दुर्घटना घडल्यास जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता महापालिकेने ओपन जिमचे साहित्य तात्काळ काढावे अथवा महावितरण आपला ट्रान्सफॉर्म इतरत्र हलवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर विविध विकास कमी करण्यात आली. मात्र बेस्ट सिटी असताना शहरात झालेली विकास कामे पुढील २० वर्षाचे नियोजन करण्यात आलेली होती. त्याच्या उलट स्मार्ट सिटीची कामे करताना कोणतेही नियोजन नाही भविष्याचा विचार केला नसल्याचे दिसते. केवळ दिखावापणा आणि कोट्यवधीचा निधी खर्ची करण्याचे काम अधिकार्याकडून करण्यात येत आहे.
शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कुठेही फुटपाथ, पेविंग ब्लॉक, रस्ता अरुंद करणे, टू व्हीलर फोर व्हीलर साठी पार्किंग झोन तयार करणे, रंगीबेरंगी झाडांना रंगरंगोटी करणे, केवळ चांगलं रस्त्यावरती रंगीबेरंगी पथदिवे बसवणे अशी अनेक ढोबळ कामे करून लोकांना दाखवण्यासाठी स्मार्ट सिटीचा विकास काम जात आहे. नवी सांगवी परिसरात स्मार्ट सिटीची कामे करताना गॅस पाईपलाईन फुटून अपघात झाले तर कामगार बांधव आपल्या दुचाकीसह खड्ड्यात पडले अशा काही घटना या परिसरात घडलेली दिसून आल्या. त्यातच आता नव्या सांगवीत महावितरणचे ट्रान्सफॉर्मर लगत ओपन जिम साहित्य बसून नागरिकांना मृत्यूस् निमंत्रण दिले जात आहे.
स्मार्ट सिटीतील अधिकारी कामे करतात ठेकेदारांची बिल देतात. स्व:ताचा आर्थिक स्वार्थ साधतात. त्यांना सामान्य नागरिकांच्या जीवाशी काहीही देणे घेणे नसते. अशा निर्ढावलेल्या भोंगळ अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का ? हे पहावे लागणार आहे.



