देहूगाव ( वार्ताहर ) देहूरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विरोधी पक्षनेत अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रांगोळी प्रदर्शन, वृक्षारोपन, वक्तृत्व स्पर्धेचे शुभेच्छा पत्र, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.
या विविध स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य रामदास सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सविता नाणेकर, पर्यवेक्षक विभावरी अभंग तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या होत्या. याचे नियोजन रेखा साळुंखे, प्राची सोनवणे, दिपाली कोळी, मिनाक्षी नरके, प्रतिभा मोरे, माधुरी खालकर, सुरेखा चिमुरकर, राजेंद्र काळोखे, विजयकुमार आहेर यांनी केले. शुभेच्छापत्र व वृक्षारोपन राजेंद्र काळोखे, सुखदेव जाधव, मनिषा कठाळे, शुभेच्छापत्र व चित्रकला स्पर्धेचे नियोजन एम.एस.शेलार यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम सांकृतिक विभागाच्या प्रमुख वैशाली उगले, रुपाली मरभळ, सुमती लोखंडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.




