पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालय धडक कारवाई पथकामार्फत प्रभाग क्रं. २१, मौजे पिंपरी मधील डिलक्स चौक ते काळेवाडी पूल रस्त्याचे दोन्ही बाजूस असलेल्या विना परवाना ४० पत्राशेड / टपऱ्यांवर निष्कासनाची/ जमीची कारवाई करणेत आली. सदर अतिक्रमण असणाऱ्या पत्राशेड/ टपऱ्यांवर अंदाजे ४०००.०० चौ.फु. क्षेत्रफळावर निष्कासनाची/ जमीनी करणेत आली.

सदरचे कारवाईसाठी २ जेसीबी, २ क्रेन, ३ डम्पर, २० मजूर, पिं. चिं. पोलीस आयुक्तालय पिंपरी पोलीस स्टेशनचे ०५ पोलीस कर्मचारी, ०५ वाहतूक पोलीस कर्मचारी, मनपाचे २२ पोलीस कर्मचारी, २४ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांचे सहकार्याने केली. सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, ग क्षेत्रीय अधिकारी श्री. विनोद जळक यांच्या नियंत्रणाखाली व ०८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ०१ कार्यालयीन अधीक्षक, २८ मनपा कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आली.




