वडगाव मावळ :- वडगाव मावळ येथील एका २९ वर्षीय युवकाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली असून त्यास अटक करून, त्याच्यावर अवैधरीत्या अग्निशस्त्र बळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश सुदाम बोत्रे (वय २९ वर्षे राः खालुंब्रे ता खेड जि.पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी (दि.२८) सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल जावळे, पोलीस अमलदार श्रीशैल कंटोळी, मनोज कदम,अमोल तावरे हे मुंबई पुणे महामार्गावर वडगाव फाटा येथे पेट्रोलिंग करित असताना वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गाच्या वडगाव उर्से फाटा या ठिकाणी आलेल्या एका युवकाकडे गावठी पिस्तुल असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक फौजदार सुनिल जावळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन तेथे असलेल्या संशयित व्यक्तीला पकडुन त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली तसेच त्याच्या जवळ अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने त्यास पोलिसांनी त्याच्या ताब्यातील पिस्तूल हस्तगत करून त्यास अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक फौजदार सुनिल जावळे, कैलास कदम, पोलीस अमलदार श्रीशैल कंटोळी, मनोज कदम, संजय सुपे, अमोल तावरे, खाडे, गणपत होले यांनी केली आहे.




