- मावळात पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये येणार महिला राज
- आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी
वडगाव मावळ : मागील अनेक दिवसांपासून इच्छुक उमेवारांना आतुरता असलेल्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली असून यामुळे अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसला असून अनेक जिल्हा परिषद सदस्य ३ गणामध्ये महिला तर पंचायत समितीच्या ६ गटात महिला आरक्षण मिळाले आहे.
मागील अनेक दिवसांपसून मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी तयारीला लागलेले इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर आरक्षणामुळे पाणी फिरले आहे.
मावळ पंचायत समिती गण
- सर्वसाधारण आरक्षण :- खडकाळा, कुरवंडे, कार्ला, कुसगाव बु., काले
- सर्वसाधारण स्त्री:- टाकवे बु., नाणे, इंदोरी, तळेगाव ग्रामीण,
- अनुसूचित जाती:- वराळे,
- अनुसूचित जमाती स्त्री :- चांदखेड
- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री :- सोमाटणे
जिल्हा परिषद गट
- सर्वसाधारण :- टाकवे बु.- नाणे
- सर्वसाधारण महिला :- कुरवंडे – कार्ला, कुसगावं बु- सोमाटणे, चांदखेड – काले
- अनुसूचित जात :- खडकाळे – वराळे
- नागरिकांचा मागास प्रवर्ग:- इंदोरी – तळेगाव दाभाडे ग्रामीण
मावळ पंचायत समितीच्या १२ गणांपैकी केवळ ५ गणांमध्ये सर्वसाधारण आरक्षण आले असल्याने मागील काही दिवसांपासून तयारी करत असलेले इच्छुक उमेदवारांचे लक्ष सर्वसाधारण आरक्षण आलेल्या या खडकाळा, कुरवंडे, कार्ला, कुसगाव बु., काले या पाच गणांमध्ये उमेदवारी मिळविण्याकरिता लागले आहे.
या पंचवार्षिक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळातील पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद सदस्य साठी अनेक उमेदवार इच्छुक होते. त्यांनी मागील वर्षभरापासून तयारी देखील सुरू केली होती मात्र मावळातील जिल्हा परिषदेच्या ६ जागांपैकी केवळ एकच जागेवर सर्वसाधारण आरक्षण आल्याने सर्वसाधारण आरक्षण आलेल्या टाकवे बु.- नाणे या गटात उमेदवारी मिळविण्याकरिता अनेकजण प्रयत्न करणार आहेत. नवीन इच्छुक उमेदवारांबरोबरच माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या गटातून उमेदवारी मागण्याची शक्यता आहे.




