पिंपरीः– कै.श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन कार्यकारी विश्वस्त युवा नेते निहाल आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज साई बाबा नगर आणि इंदिरा नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कै.श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चिंचवड तर्फे आज साई बाबा नगर आणि इंदिरा नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इंदिरानगर येथे 100 रुग्णांच्या आणि साईबाबा नगर येथे 125 रुग्णांच्या तपासण्या यशस्वी रीतीने पार पाडल्या. यामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप, कान-नाक-घसा तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाब तपासणी, दंत तपासणी, फिजिओथेरपी आणि त्याबद्दल विशेष तज्ञांच्या उपस्थितीत योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अमृता आंबेकर सिध्ध, डॉ. संज्ञा घाणेकर, डॉ.धनश्री रत्नापारखी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. कै.श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन कार्यकारी विश्वस्त निहाल पानसरे आणि डॉ.सौ.नंदिनी जोशी यांनी हे शिबीर घेऊन काम करण्याची संधी दिल्याबद्दल हॉस्पीटलचे डॉक्टर तसेच कर्मचार्यांनी त्यांचे आभार मानले.




