- मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, मोफत रक्त तपासणी
- महिलांसाठी मोफत थाइरॉइड चाचणी व वृक्षारोपण
आकुर्डी : दिवंगत नगरसेवक कै.जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम स्थळी वृक्ष वाटप करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्धघाटन सामाजिक कार्यकर्त्या फहमिदा जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकुर्डी येथील वसंतदादा पाटील मनपा शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराला ८१ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला आमदार आण्णासाहेब बनसोडे, मा. विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, मनसे शहरप्रमुख सचिन चिखले, कॉंग्रेस नेते सचिन साठे, टाटा मोटर्स युनियन कार्याध्यक्ष अशोक माने, मा. नगसेवक मोरेश्वर भोंडवे, धनंजय काळभोर, प्रसाद शेट्टी, शेखर ओव्हाळ, मा.नगरसेविका उर्मिला काळभोर, मा.नगरसेविका वैशाली काळभोर, युवा नेते रवि गोडेकर, अजय लड्डा, विश्वनाथ जगताप, अरविंद कांबळे, जेष्ठ नागरिक अण्णा कुरहड़े, जाधव सर, संपतराव शिंदे, शेखर जाधव, केदार वायाल, कामगार नेते किरण देशमुख, संजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचपुते, राष्ट्र्वादी vjnt शहराध्यक्ष निर्मला माने, महिला कार्यकर्त्या वैशाली गायकवाड़, गायत्री शर्मा, मोनिका गाढ़वे, महक इनामदार, युवा सेनेचे माऊली जगताप, रोहिदास शिवनेकर, दीपक वाघ, तुकाराम जाधव, अशोक मगर, विजय शेळके, राष्ट्रवादी युवकचे मंगेश बजबळकर, पंकज बागड़े, महेश पानसकर, दिलीप सय्यद, योगेश मोरे, शादाब खान, दिनेश पटेल, वृषभ काटे, सौरभ जगताप, अमोल पुन्नासे, विराज कुटे आदी मान्यवर उपस्तिथ होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष – निखिल दळवी यांनी केले होते. कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनी व मान्यवरानी दिवंगत नगरसेवक कै. जावेद शेख यांना आदरांजली वाहिली.




