वडगांव मावळ :- पवन मावळातील कोथुर्णे गावातील एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस व त्याच्या आईस न्यायालयाने १० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (दि.२) दुपारी कोथुर्णे येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. बुधवारी (दि.३) त्या मुलीचा मृतदेह त्याच गावातील एका शाळेच्या मागच्या बाजूला मिळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तेजस महिपती दळवी (वय २४) व त्याची आई सुजाता महिपती दळवी यांना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करत आहेत.




