पुणे, दि. 4 – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) केले आहे.
नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्यासाठी अथवा अर्जात अर्जात दुरुस्ती करण्यासाठी आता 27 ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळाव देण्यात आली आहे.
विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रवेश निवड यादी व अन्य माहितीकरीता विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या 30 टक्के जागा महिला उमेदवारांकरीता राखीव आहेत, असेही व्यवसाय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.




