वडगाव मावळ :- कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जनविकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी मावळचे तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निखिल भगत, समीर खांडगे, सुनिल कारंडे, अनिता पवार, कल्पेश भगत, मिलिंद अच्युत तसेच तळेगाव येथील शिवशक्ती भाजी मंडईतील महिला उपस्थित होत्या
जनविकास समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील एका अल्पवयीन मुलीचा ३ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर घटना मानव जातीला काळीमा फासणारी आहे. तरी आपणास विनंती आहे की आपण सदर घटनेची सखोल चौकशी करून कठोर पावले उचलावीत व मुलीच्या कुटुंबीयांस न्याय मिळवून द्यावा. तसेच दोशी नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.




