पवनानगर (वार्ताहर) कोथुर्णे येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली सदर घटनेतील आरोपीचा पोलिसांनी 24 तासात शोधुन काढला ही घटना अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपींची खटला लवकरात लवकर फास्ट ट्रक कोर्टात चालवुन मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
कोथुर्णे पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली या या प्रकरणात खटला चालवण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांची निवड करावी अशी मागणी चाकणकर यांच्याकडे केली तर महिला आयोगाच्या वतीने उज्वल निकम यांनीच खटला चालवावा अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.
पिडीत मुलीच्या आईवडिलांनी आमच्या समोर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी चाकणकर यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी ढोले पाटील, तहसिलदार मधुसुन बर्गे, कामशेत पोलिस निरीक्षक संजय जगताप उपस्थित होते




