पिंपरी : भोसरी येथे गुंडा विरोधी पथकाने कारवाईत दोन तडीपार गुंडांना लोखंडी कोयत्यासह अटक केली आहे.या दोन्ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि. 8) भोसरीतील देवकरवस्तीजवळ व निगडीतील ओटास्कीमजवळ करण्यात आल्या.
करण कुमार जाधव (वय 25 रा. मोशी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तर निगडी येथून युवराज रतन राजपुरोहीत (वय.24 रा.ओटास्कीम) याला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण याला 17 फेब्रुवारीपासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र तरीही तो भोसरी परिसरात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी करणला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी कोयता व मोबाईल फोन असा दहा हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला.
ओटास्कीम येथून युवराज याला एका लोखंडी कोयत्यासह अटक केली. त्याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून 10 जुलै रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.




