लग्न म्हटलं की मजा-मस्ती, धम्माल, गडबड या गोष्टी तर आल्याच. परंतु काही वेळा लग्नात अशा काही गोष्टी घडतात, ज्यांची आपल्याला कल्पना देखील करता येत नाही. असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्न राहिलं बाजूला, पण भर मंडपात नवरा-नवरीमध्ये हाणामारी झाली.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून हसून हैराण व्हाल, हे मात्र नक्की. या व्हिडीओमधल्या संतापलेल्या नवरीनं भर मांडवात नवरदेवाची जी धुलाई केली ती पाहण्यासारखी आहे. या भांडणामुळे मग मांडवात एकच गोंधळ माजला. या चक्रावून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी दोघे मंडपात बसलेले दिसून येत आहेत. काही वेळात दोघंही फेरीसाठी उभे राहणार तितक्यात नवरदेवाने नवरीची फिरकी घेतली. लग्नाची विधी सुरू असताना नवरी रागाने नवरदेवाच्या दिशेने हात भिरकावते. पण नवरदेव तिच्या या कृतीला प्रतिकार करताना दिसतोय.
त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. हे भांडण इतकं वाढतं की भर मंडपात दोघांमध्ये कुस्ती रंगते. आजूबाजूचे लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. हे भांडण नक्की कशामुळे झालं, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. यात नवरी इतकी चिडते की वचपा काढण्याच्या नादात ती जमिनीवर लोळून लोळून नवरदेवाला मारहाण करते.




