पुणे, दि. 10 ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रध्वज फडकविताना प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करत ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
हे नियम पाळा
राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा.
राष्ट्रध्वज 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजुने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजुने राहील याप्रमाणे फडकवावा.
राष्ट्रध्वज उतरवतांना सावधानतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.
राष्ट्रध्वज फडकवताना…
प्लॅस्टिक किंवा कागदी ध्वज वापरु नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत.
राष्ट्रध्वज फडकवाना फुलांच्या पाकळ्या ठेऊ नयेत.
राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.
राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावू नये.
एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.




