पिंपळे सौदागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहाने परिसरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त थेरगाव येथील केअर लाईफ लाईन हॉस्पीटल व नाना काटे मित्रपरिवाराच्या वतीने यांच्या विशेष सहकार्याच्या माध्यमातून नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त “हेल्थ कार्ड वाटप” करण्यात येत आहे.
प्रशांत सपकाळ यांचे जनसंपर्क कार्यालय शशिदीप निवास, महादेव मंदिराजवळ, थेरगाव येथे नागरिकांनी प्राथमिक नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 91300 08020, 9370141774, 9175296855, 8446009954 नंबरशी संपर्क साधून 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान अभियान राबवण्यात येणार आहे.
हेल्थ कार्डच्या माध्यमातून रुग्णांना खालील सुविधा देण्यात येणार आहेत.
- सदर हेल्थकार्ड, हॉस्पीटलमध्ये घेऊन आल्यास रु.5000/ पर्यंतची वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येणार आहे.
- सदर हेल्थकार्ड धारकाची एक वर्ष ओपीडी फी आकारली जाणार नाही.
- सदर हेल्थकार्ड धारकास डॉक्टटांची वर्षभर होम व्हिजिट मोफत दिली जाणार.
- हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास नॉर्मल अथवा सिझेरियन प्रसुतीचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मुलगा जन्माला आल्यास 10.000 मध्ये नॉर्मल डिलेव्हरी व 20.000 रू मध्ये सिझेरियन डिलेव्हरी करण्यात येईल.
- पिंपरी चिंचवड आणि पुणे मधील तज्ञ डॉक्टर्स यांचे तर्फे काही ऑपरेशन अल्प दरात केले जाणार आहे.




