नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम म्हणून विमान प्रवासाची भाडेवाढ होऊ शकते. नागरी उड्डाण मंत्रालयानं देशांतर्गत विमान प्रवसासाठीच्या भाड्यावरील मर्यादा रद्द केली आहे. हा निर्णय येत्या ३१ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयानं बुधवारी काढलेल्या आदेशात म्हटलं की, देशांतर्गत विमान प्रवासाच्या प्रस्तावित फेऱ्यांचा आढावा घेतल्यानंतर तसेच प्रवाशांचा विमान प्रवासाची मागणी लक्षात घेता प्रवास भाड्यावरील नियंत्रण हटवण्यात आलं आहे. ज्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतला जातो. येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.




