पिंपरी : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा ” हा विशेष अभियान राबवण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आज (गुरूवार) हातात तिरंगा घेऊन या अभियानात सहभाग नोंदवला.
पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने घरोघरी तिरंगा फडकवून “हर घर तिरंगा ” या विशेष अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदवावा. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर घरोघरी तिरंगा फडकवण्याची आपणाला ही संधी आली आहे, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने १३ ते १५ ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण भारतात ” हर घर तिरंगा ” हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला आजपासून (गुरूवार) सुरूवात झाली. यात आमदार जगताप यांनी गुरूवारी हातात तिरंगा घेऊन अभियानात सहभाग नोंदवला.




