जालना – आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये जालना येथल स्टील व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरच्या परिसरातून सुमारे 100 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 56 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने, हिरे आणि मोती आणि मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. त्याचवेळी एवढी मोठी रोकड मोजण्यासाठी 13 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
दरम्यान, इतरही ठिकाणी छापे टाकण्याचेया कारवाईत अडीचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आयकर विभागाने आपल्या टीमची पाच वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती आणि छाप्यासाठी 100 हून अधिक वाहनांचा वापर केला होता.
कापड व स्टील व्यापाऱ्याच्या घरातून सापडलेली रोकड जालना येथील स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन मोजण्यात आली. बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून रोकड मोजणीला सुरुवात झाली असून रात्री एक वाजेच्या सुमारास रोख मोजणीचे काम पूर्ण झाले. आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकण्यासाठी एक अप्रतिम योजना आखली. हा छापा अतिशय गुप्त ठेवला आणि त्यांच्या वाहनांवर ‘दुल्हन हम ले जायेंगे’ नावाचे स्टिकर्स चिकटवले होते, जेणेकरून ही वाहने लग्नाला जात असल्याची माहिती मिळू शकेल.
दुसऱ्या कारवाईत, उत्पादन शुल्क पथकाने ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील लांजीपल्ली येथे महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाकडून 1.22 कोटी रुपये रोख आणि सुमारे 20 सोन्याची बिस्किटे जप्त केली. गांजाची तस्करी रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ही रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.



