पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 10 वी व 12 वी परिक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रहाटणी- पिंपळे सौदागर प्रभागासाठी दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन 2/8/2022 ते 9/8/2022 दरम्यान राबविले गेले. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट व आधार कार्ड नाना काटे यांच्या संपर्क कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन विवेक वेलणकर (प्रख्यात करिअर समुपदेशक) करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विमल गार्डन, रहाटणी येथे होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
- रेसर सायकल 95% Above
- स्मार्ट वॉच 90% to 95%
- बॅग 70% Above
अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.




