निगडी: महाराणा प्रताप पुतळा पाठीमागे शौचालय येथून एक जेष्ठ नागरिक जाताना त्यांच्या डोक्यावर सदर बनर पडला. त्या बनरला लोखंड तार लटकत आहेत. तारेमुळे एका जेष्ठ नागरिक ह्यांच्या डोक्यात किंचित जखम झाली. हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
निगडी चौकातील फ्लेक्स कंपनीने कोणतीही प्रकारची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. निगडी बस स्टॉप येथील ४०/३० होर्डिंग बोर्ड त्वरित पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी काढून टाकावा. या ठिकाणी पीएमपीएलचा मोठा बस स्टॉप आहे. त्यामुळे नागरिकांची ही वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. एका अंध व्यक्ती निगडी बस स्टॉप रस्त्यावर जात असताना होर्डिंग बोर्ड पावसामुळे फाटून पडला
या होर्डिंग बोर्ड मुंबई पुणे रस्त्यावर वाहनं धारकाना दिशादर्शक फलक न दिसल्याने दिशाभूल होत आहे. होर्डिंग वरून निकामी झालेले फ्लेक्स जमिनीवर लटकत आहेत त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. होर्डिंग बोर्ड धारकांनी निष्काळजीपणा केल्याबद्दल पालिका प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन कारवाई करावी तसेच होल्डिंग बोर्ड परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.




