मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ व नागरिकांच्या वतीने पवनानगर बाजारपेठेत रविवारी (दि.7) उपोषण करण्यात आले. बजरंग दलाच्या शिष्ट मंडळाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्ट मंडळाने घटनेची सविस्तर माहित देऊन फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
याच उपोषणाची दखल घेत भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांची भेट घालून देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण सोडण्यात आले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी बजरंग दलाचे शिष्टमंडळ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत बुधवार (दि.10) भेट घेऊन घटनेची सविस्तर माहित देण्यात आली व निवेदन देण्यात आले.
यावेळी उपुख्यमंत्री म्हणाले की, मावळच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात येईल. मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणासाठी चांगल्यात चांगला वकील देणार असून ही केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवणार आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. पीडित कुटुंबाला शासनाच्यावतीने जी काही मदत करता येईल ती करण्यात येईल तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून 5 लाखाची मदत करण्यात येईल.




