रावेत : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रावेतच्या इस्कॉन मंदिरामध्ये तीन दिवस उत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक 18 19 आणि 20 ऑगस्ट दरम्यान हा सोहळा साजरा करण्यात येत आहे.
18 ऑगस्टला दिवसभर सर्वांसाठी दर्शन खुले राहणार आहे. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता श्री राधाकृष्ण यांचा अभिषेक, नैवेद्य आणि रात्री बारा वाजता महाआरती होईल. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची 126 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.




