नवी दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित यू ट्यूब चॅनेलचा समावेश आहे.
या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ब्लॉक यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून, या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. 21 डिसेंबरपासून भारताविरोधात मजकूर प्रसारित करणाऱ्या 102 यू ट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. यापूर्वी 25 एप्रिल 2022 रोजी मोदी सरकारने 16 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. त्या चॅनेल्समध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तान आधारित चॅनेल होते. हे चॅनेल आयटी नियम 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले होते.




