पिंपरी दि. १८ ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या बदली नंतर दोन दिवसात पुणे महानगर प्राधिकरणाचे (PMRDA) चे आयुक्त सुहास दिवसे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राहुल रंजन महिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुहास दिवसे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही. महिवाल हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २००५ मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते. दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला.




