वडगाव मावळ :- मागील सहा महिन्यांपासून वडगाव शहराला होत असणारा अनियमित व गढूळ पाणीपुरवठया संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी (दि.११) वडगाव शहरामध्ये जलआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती व नगरसेवक प्रवीण चव्हाण, शहराध्यक्ष अनंता कुडे , गटनेते दिनेश ढोरे, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, महिला आघाडी महिला मोर्चा अध्यक्ष धनश्रीताई भोंडवे, संघटनमंत्री किरण भिलारे , युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, , माजी सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर वैशाली ढोरे, संगीता ढोरे, चैत्राली ढोरे, त्याचप्रमाणे इतर महिला भगिनींनी देखील या अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठ्याबाबतीत आपल्या मनोगताद्वारे तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक प्रविण चव्हाण म्हणाले कि, नगराध्यक्ष यांनी स्वतःचे प्रसिद्धी चे इव्हेंट चे कार्यक्रम बंद करून, नगरपंचायत चे माध्यमातून पहिले जनतेचे प्रश्न सोडवावेत. शहर अध्यक्ष अनंता कुडे म्हणाले कि सत्ताधाऱ्यांची सत्तेची मस्ती पुढील काळात जनता उतरावले शिवाय राहणार नाही .
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले कि, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आम्ही नगरपंचायत च्या यागलथान कारभाराची चौकशी करायला लावणार आहे आणि वडगावकर जनतेला न्याय मिळवून देणार असे मत व्यक्त केले
गटनेते दिनेश ढोरे म्हणाले कि, प्रशासन व सत्ताधारी सुस्त असल्याने आणि टक्केवारीत व्यस्त असल्याने त्याचा नाहक त्रास वडगावातील जनतेला भोगावा लागत आहे.
याप्रसंगी सरचिटणीस मकरंद बवरे , कल्पेश भोंडवे, ज्ञानेश्वर पगडे, नितीन कुडे, नारायण ढोरे, खंडू भिलारे, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेविका सुनीता भिलारे, शरद मोरे, श्रीधर चव्हाण, माजी नगरसेवक विजयराव जाधव, प्रसाद पिंगळे, भूषण मुथा, वडगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर ,दीपक भालेराव, अतुल म्हाळसकर, कुलदीप ढोरे , प्रज्योत म्हाळसकर, संतोष म्हाळसकर , शेखर वहिले, प्रशांत चव्हाण, रमेश ढोरे, योगेश म्हाळसकर , प्रास्तविक महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे व आभार कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे यांनी मानले. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सदर निवेदन स्वीकारले




