तळेगांव स्टेशन (वार्ताहर) नवीन समर्थ विद्यालयात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. ज्येष्ठ अध्यापक रेवप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील, अरविंद नाईकरे, युवराज रोंगटे यानी कार्यक्रमाचे नियोजन केले.
शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक संजय वंजारे, पर्यवेक्षक भाऊसाहेब आगवणे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे तसेच दहीहंडीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी अतिशय सुश्राव्य असे श्रीकृष्णाचे गीत सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णा जन्माष्टमी विषयी मनोगते व्यक्त केली.
त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या विविध रुपांचे, त्याच्या नटखट लिलांचे वर्णन करणारी मधुराष्टके विद्यार्थीनींनी सुरेल आवाजात सादर केली. त्यानंतर अतिशय उत्साही वातावरणात श्रीकृष्णाचा पाळणा व दहीहंडीचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.




