पिंपरी, दि. १९ ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत दि १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग यांच्या आदेशान्वये महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची महापालिकेच्या प्रशासक पदी नियुक्ती केली होती.
राजेश पाटील यांची बदली झाल्यामुळे महापालिकेचे आयुक्त म्हणून दि. १८- ८- २०२२ रोजी शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला आहे. तसेच नगर विकास विभाग यांच्या आदेशान्वये प्रशासक पदाचा कार्यभार देखील आयुक्त शेखर सिंह यांनी स्वीकारला आहे. याबाबतची महिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.




