- न्याय समता बंधुता मानणाऱ्या देशासाठी ही तर धोक्याची घंटा…- प्रमोद क्षिरसागर
निगडी : राजस्थान राज्यातील सुराणा येथील ९ वर्षीय इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शाळेतील पाण्याचा माठाला स्पर्श केला म्हणून शिक्षकाकडूनच अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या मारहाणीत विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. सदर प्रकरणाच्या निषेधार्थ आज निगडी येथे लढा यूथ मूव्हमेंट च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
या निषेध आंदोलनात आपली भूमिका मांडत असताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सववर्षा नंतरही जातीयतेचा संघर्ष संपलेला नाही, समता बंधुता न्याय मानणार्या देशातील शिक्षकच अशा प्रकारे संकुचित होत असतील तर ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक विचार करून राजस्थान सरकारने जलदगती न्यायालयात सदर खटला चालवत आरोपीला फाशीची शिक्षा देऊन साठ दिवसात इंद्र कुमार मेघवाल ला न्याय दिला पाहिजे.
यावेळी भागातील सामाजिक कार्यकर्ते सूरज गायकवाड, गौतम पटेकर, अनिकेत साळुंखे,लढा यूथ मूव्हमेंट चे अध्यक्ष बुद्धभूषण अहिरे, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, समाधान कांबळे,पंकज धेंडे, अतिश नागटिळक, संदीप माने, अजय गायकवाड, राकेश माने, गणा गाजरे, ज्ञानेश्वर काळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




