मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून बुधवारी 16 महिन्यांनंतर अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर (AMEX) लादलेले व्यावसायिक निर्बंध उठवले. RBI बँकेच्या या निर्णयानंतर आता भारतातील नवीन ग्राहकांना कार्ड जारी करू शकते. पेमेंट सिस्टम डेटा स्टोरेजचे पालन न केल्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यापासून या बँकेच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती.
याबाबत आरबीआयनं एका निवेदनात म्हटलं की, AMEX चे डेटा स्टोरेजकडून आता समाधानकारक पद्धतीनं नियमांचे पालन केलं जात आहे. AMEX नं रिझर्व्ह बँकेच्या 6 एप्रिल 2018 रोजीच्या पेमेंट सिस्टम डेटाच्या संचयनाच्या परिपत्रकासह सादर केलेल्या समाधानकारक अमंलबजावणी होत असल्यानं निदर्शनास आल्यानं 23 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार लादण्यात आलेले निर्बंध तसेच नवीन घरगुती ग्राहकांचे बोर्डिंग तात्काळ प्रभावाने उठवण्यात आले आहे.




