नवी दिल्ली : व्हॉट्सअँप आणि फेसबुकच्या नव्या गोपनियता नियमांबाबत भारतीय प्रतिस्पर्धी आयोगानं (CCI) दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या आपला निर्णय देणार आहे. या दोन्ही अॅपच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी कोर्टानं याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता.
सीसीआयनं गेल्यावर्षी या दोन्ही अॅपच्या नव्या गोपनियता अॅपच्या चौकशीचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी म्हटलं होतं की, या कंपन्यांनी प्रतिस्पर्धा अधिनियम २००० चं उल्लंघन केलं आहे. आयोगानं या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवली होती. या नोटिशीत म्हटलं होतं की, कंपन्यांची गोपनियता धोरण पारदर्शी नव्हते तसेच वापरकर्त्याच्या स्वैच्छिक सहमतीवर आधारित नव्हतं.




