नवी दिल्ली : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण २० वर्षांपूर्वीचं जमीन व्यवहाराचं आहे. मात्र, आरटीआयमध्ये मलिकांनी आरोप केल्याप्रमाणे काहीही केलं नसल्याचं उत्तर आलं आहे,” असा दावा शरद पवारांनी केला. तसेच मलिक सरकारविरोधात बोलत होते म्हणूनच कारवाई झाल्याचा आरोप केला. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवाब मलिकांवरील कारवाईवर बोलताना शरद पवार म्हणाले, “नवाब मलिकांनी काय केलं होतं? नवाब मलिकांची एकच चूक होती ती म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते. ते प्रामाणिकपणे दररोज जिथं कुठं चुकीचं होईल ते लोकांसमोर ठेवण्याचं काम करत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
२० वर्षांपूर्वी एक जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता. हे प्रकरण काय होतं, तर २० वर्षांपूर्वी एक जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता आणि त्यात त्यांनी काहीतरी केलं होतं. मी मलिकांनी नेमकं काय चुकीचं केलं ही माहिती मागितली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही असं शरद पवारांनी सांगितलं.


