पिंपरी (प्रतिनिधी) – रावेतमधील २४ पत्राशेड आणि तीन वीटांची बांधकामे, अशा एकूण २७ अनधिकृत बांधकांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि. २४) ब क्षेत्रीय कार्यायलाच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा महापालिकेने लावला आहे. त्यानुसार व क्षेत्रीय कार्यालयाने रावेतमधील धर्मराज चौक, स्मशान भूमी, म्हस्के वस्ती येथील २१ हजार ३७० चौरस फूटांमधील पत्रा शेड आणि तीन वीटांचे बांधका यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, कनिष्ठ अभियंता अमोल पवार, दिनेश नेहरकर, अमित शिंदे, स्वप्नील गाडीवाल, अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी, ३८ पोलीस कर्मचारी, दोन जेसीबी आणि १५ मजुरांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.




