पिंपरी : रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील कचरा समस्या गंभीर आहे. दौंनदिन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. तरीही दररोज कचरा गोळा केला जात नाही. त्यामुळे कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून परिसरातील कचरा समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचे काम में. अँन्थोनी ग्रुप प्रा.ली या कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील दैनदिन कचरा गोळा करण्याचे काम केले जात आहे. मात्र परिसरात वेळेवर कचरा उचलला जात नाही. याबाबत उत्तर मागितल्यास त्यांच्याकडून गाडी उशिरा येणार असल्याचे कारण वारंवार सांगण्यात येत आहे. त्यातच मनपा आरोग्य विभागातर्फे तो पर्यंत कचरा सोसायटी आवारात ठेवावा अश्या सूचना केल्या जातात.
सोसायटी मधील हाउसकीपिंग कामगार हे सकाळच्या वेळेत उपलब्ध असतात. कचरा उचलणारी गाडी सायंकाळी येण्याच्या वेळेत कचरा टाकण्यास कोणी कर्मचारी भेटत नाही. अश्याने तो कचरा सोसायटी परिसरात राहतो व तो वेळेवर न उचलल्याने सोसायटी परिसरात दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून, कचऱ्याची तक्रार नागरिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्याकडे करतात. आमच्या पाहणीच्या वेळेत संबंधित कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या या नादुरुस्त अवस्थेत दिसून आल्या आहेत. तसेच त्यांचे वारिष्ट अधिकारी बघू करू सांगतो अशी उडवा उडवीची उत्तरे देतात.
त्यामुळे सोसायटी व परिसरात कचरा साठून राहत असल्याने रहाटणी पिंपळे सौदागर मधील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व दैनंदिन कचरा उचलणाऱ्या कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व रहाटणी पिंपळे सौदागार मधील कचऱ्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.




