बंगळूर : दोन टक्के, पाच आणि नंतर दहा टक्के असा सरकारी कामांसाठीचा रेट असल्याची चर्चा आतापर्यंत होती. मात्र कर्नाटकात आता पूर्ण हद्दच ओलांडली असून येथील कंत्राटदारांना तब्बल 40 टक्के कमिशन दिल्याशिवाय कामेच होत नसल्याची तक्रार आता कंत्राटदारांचच्या संघटनेने केली आहे.
कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या सरकारी कंत्राटांमध्ये ४० टक्के कमिशनच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यास सांगितले. कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांना निवेदन देऊन कमिशनच्या तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी केली.




