देहूरोड ,दि.२७ ऑगस्ट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालय येथे शनिवार ( दि. २७ ) स्वनिर्मितीचा निखळ आनंद मिळावा व पर्यावरण संरक्षणाची भावना विद्यार्थ्या मध्ये निर्माण व्हावे यासाठी ” शाडूच्या मातीचे श्री गणेश ” मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून या प्रकल्पातून पर्यावरण रक्षण व स्वनिर्मिती असा दुहेरी आनंद विद्यार्थ्यांना मिळावा असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप आर .एन. यांनी प्रास्ताविक करताना व्यक्त केले. कलाशिक्षक मिलिंद शेलार यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करून पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे.
पोषक वातावरणाची निर्मिती करणे. हा कार्यशाळेचा उद्देश होता.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्री गणेशाच्या मनमोहक मूर्ती तयार केल्या. या कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका अभंग व्ही. एस. यांनी केले. सूत्रसंचालन जाधव एस. डी. यांनी केले. मुसुडगे व्ही.बी. यांनी आभार मानले.




