वडगाव मावळ :- वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक फौजदार जावळे, पोलीस हवालदार सचिन काळे, अमोल कसबेकर, पोलीस नाईक शशिकांत खोपडे यांना पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ट्रान्सफॉर्मर चोरांना पकडण्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गद्शनाखाली पथक तयार करून या गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपींसह चोरीस गेलेल्या मुद्देमाल पूर्णपणे हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल शनिवारी (दि.२७) पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचा सन्मान केला आहे.




