पिंपरी (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठेत रविवारी तुडुंब गर्दी होती. बुधवारी (दि. २१) गणेशाचे आगमन होणार असल्याने सजावटीचे साहित्य खरेदीची लगबग होती. त्यात पिंपरी आणि चिंचवड परिसरात येणान्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या जाणवत होती. त्यामुळे वाहतूक कोडीतही भर पडली होती.
पिंपरी चिंचवडसह उपनगरांतील बाजारपेठेतील रविवारचे चित्र असेच होते. गेली दोन वर्षे उत्सव साजरा करता आला नसल्याने नागरिकांची बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारचे खरेदीसाठी शहरभर सर्व मार्केट परिसरात तुडुंब गर्दी गणेशोत्सव आहे, तर त्यानंतर गौरीचे आगमन होते. उत्सवापूर्वीचा हा रविवार असल्याने खरेदीला उधान आले होते.
प्रत्येकजण नावीन्यपूर्ण वस्तू पाहण्यात आणि त्यांची खरेदी करण्यात मग्र होते. बाजारात सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. त्यात. विजेच्या माळा, हँगिंग बेल, झिरमिळ्या फुलांच्या माळा, कमानी, मखर तसेच गौरीचे मुखवटे, स्टैंड, दागिने व इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. सजावटीसाठी कापडी मखर, सोनेरी चंदेरी रंगातील हँगिंग बेल लक्ष वेधून घेत होते.
पार्किंगची समस्या, कोंडीत भर पिंपरी कॅम्प ही शहरातील मध्यवर्ती व मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे उपनगरांतून खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, त्या तुलनेत पार्किंगसाठी जागा अपुरी आहे. तसेच येणारे नागरिकही वाहने वेडीवाकडी लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. बाजारपेठेत नागरिकांची तर, रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. त्यामुळे इतरांना कोंडीचा सामना करावा लागला.




