पुणे (प्रतिनिधी) गणेशोत्सव एक दिवसांवर येऊन ठेपला असून, घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (३१ ऑगस्ट) ब्राह्ममुहूर्त पहाटे ४ वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करावी.
विशेषत: श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त ३१ ऑगस्ट २०२२ साधारणपणे – सकाळी ६.२५ ते ९.३३ व सकाळी ११.०७ मि. ते १२. ३४ अगदीच तुम्हाला शास्त्रशुद्ध आणि योग्य काळामध्ये गणपती बसवायचा असेल तर सकाळी ६:२५ ते ७.५३ हा लाभ काळ आहे ७.५३ ते ७.२७ हा अमृत काळ आहे तर सकाळी ११.०७ मि. ते १२ वा. ३४ सांगितले. त्यातील कोणत्या मुहूर्तावर कोणी गणपती बसवावा हे थोडेसे सखोल पद्धतीने सांगतो अर्थात आधी तुम्हाला जे मुहूर्त सांगितले आहेत ते फॉलो केले तरी चालण्यासारखे आहेत.
अगदीच बारकाईने गणपती स्थापन करायचा असेल तर सकाळी ६:२५ ते ७:२२ हा बुधाचा होरा आहे. त्यामुळे व्यापार करणारी मंडळी शेती करणारी मंडळी तसेच स्वयंभू मंडळी विद्यार्थी विद्याप्राप्ती हेतू व्यापार धनप्राप्ती हेतू वाचा प्रभाव घेतो. आपण या काळात गणपती बसू शकतात तर ज्यांना मानसिक शांतता हवी आहे. उदाहरणार्थ रिटायर्ड मंडळी किंवा काहीही धावपळ न करता घरबसल्याच्या मंडळींना धन मिळते अशी मंडळी सकाळी ७.२२ ते ८.२४ या काळात गणपती स्थापन करू शकतात.
बुधाचा होरा तर टेक्निकल क्षेत्रातील मंडळी जसे की इंजिनियर्स लोखंडाशी संबंधित किंवा टेक्निकल क्षेत्राशी संबंधित मंडळींनी ८.२४ ते ९.२७ या काळात गणपती बसवावा श्री शनीचा होरा आर्मी नेहमी पोलीस खाते संरक्षण खाते लढाऊ क्षेत्रात काम करणारी मंडळी यांनी ११ वाजून ०७ मिनिटात ११ वाजून ३२ मी. या काळात गणपती बसवावा.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे दाते पंचागकर्ते’ चे मोहन दाते यांनी सांगितले.




