पिंपरी (प्रतिनिधी) स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या पिपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात तब्बल ८० हजार भटके श्वान असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोविड 19 च्या काळातही रस्त्याने माणसे दिसत नव्हती अशावेळी महापालिकेकडून चोखपणे कुत्र्यांची नसबंदी केली होती. त्यानंतरही पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली निर्बिजीकरणाची मोहीम कचुकामी ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात भटके श्वान असल्याची वारंवार तक्रारी येत आहेत. मटकी कुत्रा चावल्याच्या पटना वेळोवेळी पडत आहेत. त्यामुळे भटक्या श्वानांचे महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाकडून वरचेवर निर्भीजीकरण करण्यात येत आहे.
नेहरूनगर येथील डॉग पॉन्ड येथे बजाज संस्थेच्या वतीने संस्था मोफत निर्बिजीकरण करत असून आत्तापर्यंत ८० भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पशु वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, अॅनिमल कॅनॉय केअर अँण्ड कंट्रोल या संस्थेच्यामार्फत विभागाच्या वतीने वेळोवेळी निर्बिजीकरणाची मोहीम भटक्या श्वानांचे निर्बिजीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे.




