पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लेखाधिकारी वसंत उगले, कामगार महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.




