बिजिंग– परग्रहांवर जीवन शोधत असलेले अंतराळवीर नवनवे प्रयोग करीत आहेत. हे सगळे प्रयोग अंतराळात सुरु आहेत. अंतराळावर कब्जा मिळवण्यासाठी काही बलाढ्य देशांमध्ये संघर्षही सुरु आहे. यातच चीनच्या अंतराळ क्षेत्रातील अंतराळवीरांनी एक मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी चक्क अंतराळात तांदूळ पिकवला आहे.
Chinese astronauts, or taikonauts, have been experimenting with growing rice and vegetables in the Tiangong space station. pic.twitter.com/hqbGthOQ8D
— South China Morning Post (@SCMPNews) August 31, 2022
या अंतराळविरांकडे असलेल्या तांदळाच्या दाण्यातून त्यांनी अंतराळात हे भाताचं रोप पिकवलं आहे. याचबरोबर थेल क्रेस नावाचं एक रोपही अंतराळात उगवण्यात त्यांना यश आलेलं आहे. हे थेल क्रेस पत्ताकोबी किंवा ब्रसल स्पाऊटसारख्या हिरव्या भाज्यांचं प्रतिनिधित्व करत आहे.
अंतराळात वेगाने झाली रोपांची वाढ
चायनिज अकादमी ऑफ सायन्सने टीव्ही टॅनेल CGTN ला सांगितले की, या थेल क्रेस्टच्या रोपाला एका महिन्यात काही पानेही आली आहेत. तर लांब कणाच्या तांदळातून 30 सेंटिमीटर तर छोट्या कणातून 5 सेटिंमीटर रोपे उगवलेली आहेत.
याचबरोबर इतरही काही भाज्या अंतराळात उगवण्यासाठी चिनी अंतराळवीरांचे प्रयत्न सुरु आहेत. चीनच्या तिआनगोंग स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या झिरो ग्रॅव्हिटी प्रयोगशाळेत सुरु असलेल्या या प्रयोगांना यश मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.




