मुंबई : पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी, गणपतीचे घेतले दर्शन घेतले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात गणेशोत्सवामुळे आनदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतो. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती.
गणेशोत्सव कालपासून सुरु झाला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणेशाच्या दर्शनासाठी जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही कालपासून ठाणे आणि मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळत आहेत. सकाळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी गणेश दर्शन घेतले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. आगामी काळातील युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.



