तळेगांव (वार्ताहर) गुरुवर्य कै.अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा ॲड.पू. वा.परांजपे विद्या मंदिरात संपन्न झाले. याचे पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमासाठी नू.म.वि.प्र.मंडळाचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे , काशिनाथ निंबळे, यशवंत भेगडे, प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी शाळेचा चढता आलेख आपल्या प्रास्ताविकेतून मांडला. सोनबा गोपाळे सर यांनी बौद्धिक स्पर्धेमध्ये ३३ वर्षात होत गेलेले बदल सांगितले. बाळासाहेब शिंदे सर यांनी बौद्धिक स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच या बौद्धिक स्पर्धेसाठी देणगीचे आवाहन केले. सचिव संतोष खांडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी संतोष खांडगे यांनी त्यांचे आजोबा , संस्थेचे माजी अध्यक्ष कै.मावळभूषण मामासाहेब खांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ २५००० हजार रुपये व अनिल धर्माधिकारी यांनी त्यांच्या मातोश्री लीलाताई मधुकर धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ५००१ रुपयांची देणगी ठेव स्वरुपात बौद्धिक स्पर्धेसाठी दिली.
पद्य पाठांतर, निबंध व वक्तृत्व अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७००, ६००, ५००, ४०० रुपये रोख प्रशस्तीपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच NMMS परीक्षेत खुल्या गटातून अकराव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीत आलेल्या शुभम संताजी माळी या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बौद्धिक स्पर्धा विभाग प्रमुख दीप्ती बारमुख मॅडम, शरद जांभळे, संपत गोडे, संतोष घरदाळे, आशा आवटे मॅडम, अनिता नागपुरे मॅडम, संगिता खराडे मॅडम सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारमुख व रजनी बधाले यांनी केले. तसेच आभार शाळेचे पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले.




