पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर मधील ६ वर्षाच्या भार्गवचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले घरी जावून सत्कार करून कौतुक केले. भार्गव विजय राजगुडे हा पहिली इयत्तामध्ये पिंपळे सौदागर येथील विबगेअर स्कुलमध्ये शिकत आहे. त्याला स्केटटींग सोबत संस्कृतीक ढोल ताशा वादक करण्याची आवड आहे. त्याने पुण्यात आज मानाच्या कसबा गणपती समोर संस्कृतीक ढोल ताशा वादन केले आहे. यावेळी अर्जुन काटे, रमेश मचाले, विजय राजगुडे, धिरेद्रं आगटे, निलेश जगताप, धिरेद्रं सेगंर उपस्थित होते.
बेळगांव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगांव दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २९ मे ते २ जून या कालावधीत ९६ तासांच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कारण्याचा प्रयत्न केला गेला. भार्गव राजगुडे यांनी लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन स्केटिंग प्रकारात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. भार्गवचे याबाबतचे अधिकृत सर्टिफिकेट आज भेटले आहे.
याचबरोबर शिवगंगा रोलर स्केटिंग रींकवर आणखी एका गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी सलग ९६ तास स्केटिंग करण्याचा पराक्रम भार्गव आणि त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी केला आहे. अद्याप त्याचे अधिकृत कॉन्फीर्मशन येणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील अगदी कमी वयात गिनीज बुकमध्ये नोंद केलेल्या भार्गवच्या कार्यास सलाम करत नाना काटे यांनी त्याचे घरी जाऊन कौतुक केले.




